'अधुरे अधुरे...' हे आगामी मधुर प्रेमगीत आहे, अभिनेता-दिग्दर्शक अस्लम खान यांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या गीताचे प्रमुख कलाकार टेलिव्हिजन अभिनेता शक्ति अरोरा आणि मॉडेल चांदिनी शर्मा आहेत . अस्लम यांनी 'नयी पडोसन', 'वेलकम बॅक', 'काँटे' यांसारख्या अनेक मोठ्या बॉलीवूड चित्रपटातून दर्शकांचे मनोरंजन केले आहे. नुकतेच 'अधुरे अधुरे...' हे गाणे मालाड येथील अथर्व महाविद्यालयात शूट करण्यात आले. गायक-संगीतकार श्री डी यांनी ह्या गीताचे बोल लिहले आहेत व त्यांनीच ते गायले देखील आहे. हे गीत एका जोडप्याची कथा मांडते जे एकत्र राहतात आणि नंतर त्यांच्या व्यक्तिगत अहंकारामुळे विभक्त होण्याची वेळ येते, शेवटी त्यांच्या असे लक्षात येते कि त्यांचे अपूर्ण असणे त्यांना पूर्ण करते.
Shakti Arora & Chandini Sharma behind the scenes from song shoot of Adhure Adhure by Director Aslam Khan |
निर्देशक अस्लम खान यांनी सांगितले की, "जेव्हा तुम्ही हे गाणे पाहाल तुमच्या तेव्हा नक्कीच लक्षात येईल की, हे गीत एका चित्रपटासारखे आहे, चार मिनिट लांब चित्रपट. ज्याला विशिष्ट सुरुवात, मध्य आणि एक निश्चित शेवट आहे. अपूर्ण स्पर्शाचा... एक परिपूर्ण स्टोरीबोर्ड अपूर्ण समाप्तीसह. शक्ति अरोरा आणि चंदिनी शर्मा यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव उत्तम होता ते अत्यंत उत्तम कलाकार आहेत आणि ह्या गाण्यासाठी अतिशय परिपूर्ण अशी स्टारकास्टसुद्धा. त्यांनी या गाण्यावर उत्तम अभिनय केला आहे. हा एक अद्भुत अनुभव होता."
'मेरी आशिक़ी तुमसे ही' आणि 'सिलसिला बदलते रिश्तों का' यांसारख्या मालिकांतून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे अभिनेता शक्ती अरोरा यांना आधी हे गाणे इतर गाण्यांसारखे एक सामान्य गाणे वाटले होते. ते सांगतात की, "जेव्हा मी हे गाणे वारंवार ऐकलं, मला जाणवलं की हे गाणे काहीतरी वेगळं आहे आणि ते थेट हृदयाला स्पर्श करते. हे एक सूफी गाणे आहे. ते ऐकताना छान वाटत आहे आणि दीर्घ ड्राइव्हसाठी अगदी योग्य निवड आहे. चांदिनी शर्मा शक्ती अरोराशी सहमत होत म्हणतात की," हे खरोखरच एक आल्हाददायक गाणे आहे! ते ऐकल्यानंतर, आपल्याला हे समजेल की आपण आधीपासूनच त्याच्याशी कनेक्ट केलेले आहे. हे गाणे बालिश नसून त्यात एक प्रकारची निर्दोषता आहे."
'अधुरे अधुरे...' ही अस्लम खान यांची निर्देशन क्षेत्रातील पंचविसावी कलाकृती आहे. जेव्हा त्यांना विचारले गेले की, कॅमेराच्या मागे आणि कॅमेरा समोर काम करताना काय फरक पडला? तेव्हा ते सांगतात की, "दोन्ही मार्गांनी काम करण्यात त्याची स्वतःची वेगळीच मजा आहे, परंतु त्या दोघांमध्ये विशेष फरक आहे. मी एक अभिनेता देखील आहे आणि म्हणूनच मला माहित आहे की एका निर्देशकाने कोणत्या लहान गोष्टींची काळजी घ्यावी."
शेवटी अस्लम खान म्हणतात की, "अंत भला तो सब भला. मला आनंद आहे की, मला जसे गाणे तयार करायचे होते हे अगदी तसेच एक उत्तम गाणे बनले आहे."
No comments:
Post a Comment