महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर भारताच्या अनेक शहरात हजारो लिटर दुधाची नासधूस होते, हे दुर्दैवी चित्र जवळपास प्रत्येक शहरांमध्ये अधिक प्रमाणात आपल्याला पाहायला मिळते. परंतु यावर्षी मात्र हे चित्र बदललेलं दिसले. टीम 'अँपल मिशन' जी अनेक सामाजिक आणि परोपकारी कार्यात कार्यरत आहे, यावेळी मुंबईतील गोरेगाव आणि मालाड परिसरातील गरजू लोकांना वेगवेगळ्या चवीच्या दुधाच्या बाटल्यांचे वाटप केले.
अँपल मिशनचे संस्थापक डॉ. अनील काशी मुरारका सांगतात की, "प्रत्येक वर्षी, महाशिवरात्री दरम्यान, आपल्या देशात देवाला अनेक लिटर दूध अर्पीत केले जाते आम्ही, 'अँपल मिशन' द्वारे त्यापेक्षा काही वेगळे आणि चांगले करण्याचे ठरविले आहे, आम्हाला त्या वंचित लोकांना मदत करायची होती. आणि त्याबदल्यात त्यांनी व्यक्त केलेली कृतज्ञतेची भावना अमूल्य होती. आम्ही या सर्वांचे खूप आभारी आहोत.”
No comments:
Post a Comment