Thursday, 9 April 2020

उर्वशी शर्मा चॅरिटीसाठी घेणार कलेचा आधार


जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या जगभरामध्ये लॉकडाऊन  संचारबंदी लागू आहेभारतात या २१ दिवसांच्या लोकडॉऊन कालावधीत बरेच लोक स्वतःला  एकदा  घेत आहेतनवीन नवीन गोष्टी करत आहेतआजमावत आहेत ज्यासाठी यापूर्वी त्या कधी वेळ मिळाला नव्हताआणि ह्यामध्ये आपले बॉलीवूड कलाकार अपवाद नाहीत!  काही लोक हा मिळालेला वेळ कुटुंबासमवेत घालवत आहेत तर काही  फिटनेसघरगुती कामांवर लक्ष देन्यासाठी तर काहीजण जुन्या छंदांचा पाठपुरावा करीत आहेत किंवा नवीन काही करत आहेत!
२१ दिवसांच्या लोकडॉऊन पार्श्वभूमीवर नकाबबार्बरखट्टा मीठाचक्रधार यासारख्या चित्रपटांत आणि आतिफ असलमच्या 'दुरीआणि मिकाच्या 'समथिंग समथिंगया गाण्यांमध्ये तिच्या मोहक 

अदाकारीसाठी ओळखल्या जाणार्या अभिनेत्री-मॉडेल उर्वशी शर्मा यांनी मेणबत्त्या बनवणेआणि भरतकामाचा एक नवीन छंद जोपासला आहे. “अलीकडे, मी मेणबत्या आणि फुल बनविणे, भरतकाम, विणकाम आणि मण्यांचे काम केले आहे. माझ्या मुलांसमवेत दर्जेदार वेळ घालवण्याशिवाय मी चित्रकलाही करते आहे. एकंदरीत, हे एक अत्यंत उत्पादक क्वारंटाईन ठरले आहे माझ्यासाठी! ” उर्वशी म्हणाली.

उर्वशी यांनी अभिनेता-उद्योजक सचिन जे. जोशी यांच्याशी लग्न केले. या जोडप्याला एक मुलगी समीरा आणि एक मुलगा शिववंश आहे.सध्या लाकडाऊन मुळे सचिन दुबईत अडकले आहेत. “सर्जनशीलता ही माझी आवड आहे. मी काही सामान्य करीत नाही ... आमच्या सुंदर घराच्या प्रत्येक कोप ऱ्यावर माझा एक खास स्पर्श आहे. ” उर्वशी शर्मा सध्या भगवान शिव यांच्या रूपावर प्रेरित भरतकाम करत आहेत. यापूर्वी तिने साई बाबा, हनुमान, भगवान गणेश, येशू, मदर मेरी आणि बाल येशू यांवर नक्षीकाम केले आहे. यावर ती  म्हणाली, "एक काम पूर्ण होण्यासाठी - आठवड्याचा कालावधी लागतो."

उर्वशी आणि सचिन यांच्या आलिशान घरात दगडांवर मां काली, शिव आणि पार्वती यांची रूप  रंगलेली दिसतील. “मला कला हस्तकला या विषयी खास प्रेम आहे आणि यासाठी मी दररोज वेळ काढते. आमच्या बिग ब्रदर फाउंडेशनसाठी निधी गोळा करण्यासाठी मी ह्या कलाकृतीची विक्री करणार आहे, ”उर्वशी म्हणाल्या. २०१२ मध्ये नफा विरहित पुढाकार म्हणून बिग ब्रदर फाउंडेशनची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातील वंचितांची मुले महिलांच्या सक्षमीकरणासाठी दूरदर्शी जोडी उर्वशी शर्मा-सचिन जे. जोशी यांनी उत्कट प्रयत्न केले आहेत. अलीकडेच, या कठीण काळात देशभरात अन्न वितरण अभियान राबविण्याची आणि गरजू लोकांना मदत करण्याच्या उद्देशामुळे  हि संस्था चर्चेत आली.

बर्याच लोकांसाठी क्वारंटाईन हा सक्तीचा वेळ आहे पण उर्वशी शर्मा यांनी याबद्दल सांगितले, “हे सर्व करण्याची माझ्यासाठी योग्य वेळ आहे. आपण नेहमीच आपल्या आवडत्या गोष्टी करण्यासाठी वेळ शोधत असतो."  



No comments:

Post a Comment