Wednesday, 10 June 2020

मंत्री अस्लम शेख यांच्याहस्ते डबेवाल्यांना २,५०० रेशन किटचं वितरण.



 महाविकास आघाडीचं सरकार डबेवाल्यांच्या पाठिशी ना. अस्लम शेख.


 मुंबई दि. ०८ : मुंबई शहरचे पालकमंत्री ना. अस्लम शेख यांच्या हस्ते सोमवारी  डबेवाल्यांना  ,५०० रेशन किटचं वितरण  करण्यात आलं.मुंबई महानगरपालिकेच्या पी- उत्तर विभागाच्या कार्यालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.यावेळी मुंबई डबेवाले संघटनेचे अध्यक्ष रमेश करोंदे, सहाय्यक प्रवक्ता विनोद शेटे , मेक अर्थ ग्रिन अगेन मेगा फाऊंडेशनच्या श्रीमती अनुशा श्रीनिवासन अय्यर महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

यावेळी टाळेबंदीमुळे डबेवाल्यांसमोर उभं राहिलेलं आर्थिक संकट, भविष्यातली या व्यवसायाशी निगडित आव्हाने प्रश्न मुंबई डेबेवाला संंघटनेचे अध्यक्ष श्री.रामदास  करोंदे यांनी ना.अस्लम शेख यांच्यासमोर मांडले.  बांधकाम मजूरांना केल्या जाणाऱ्या मदतीच्या धर्तीवर डबेवाल्यांनाही दोन हजार रुपयांची मदत करण्याची चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुणे  जिल्ह्याचे मुळ निवासी असणाऱ्या डबेवाल्यांना त्वरीत पंचनामे करुन  नुकसान भरपाई देण्याची मागणी संघटनेचे प्रवक्ते श्री विनोद शेेटे यांनी केली. _

 _ना. अस्लम शेख म्हणाले की, डबेवाले हे मुंबईची दुसरी जीवननाहिनी आहेत. डबेवाले १३० वर्षांपासून प्रामाणिकपणे सचोटीने कार्यालयांमध्ये वेळेवेर जेवणाचे डबे पोहोचविण्याचे काम करीत आहेत. लॉकडाऊन संपेपर्यंत  डबेवाल्यांच्या रेशनची व्यवस्था करण्याची डबेवाल्यांचे सर्व प्रश्न येत्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मांडण्याची ग्वाही, ना. शेख यांनी यावेळी डबेवाल्यांना दिली. तसेच चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या पुण्यातील डबेवाल्यांच्या घरांचे पचनामे त्वरीत  करण्याचे  आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्यची माहिती ना. अस्लम शेख यांनी दिली.

No comments:

Post a Comment